खेड (प्रतिनिधी)
स्वराज्य कोकण प्रतिष्ठानच्यावतीने २० जुलै रोजी सकाळी १० वाजता टिटवाळा-ठाणे येथे विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील, उद्योजक रवी पाटील, युवासेना विभागप्रमुख सचिन गायकवाड, शाखाप्रमुख महेश पाटील यांच्यासह स्वराज्य कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप घाणेकर, सरचिटणीस मनिष लोंढे, खजिनदार गणेश वाघजे, शिक्षण समिती प्रमुख रमेश गुजाळ, अमित शिगवण, संदीप जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.










