गावखडी/ वार्ताहर :
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत राष्ट्रीय किटकजनय रोग नियंत्रण कार्यक्रम हिवताप प्रतिरोध महिना जून निमित्ताने जनजागृतीपर व्याख्यान रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती रत्नागिरी किटक शास्त्रज्ञ श्रीम.सोनाली मेस्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, शिक्षिका ऐश्वर्या गुरव, शालेय स्वराज्य मंत्रीमंडळ मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर, उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचा हेतू उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी विशद केला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत उपशिक्षिका संजया पावसकर यांनी केले.
त्यानंतर किटक शास्त्रज्ञ सौ.सोनाली मेस्त्री यांनी किटकजनय आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना या विषयावर व्याख्यान दिले.तसेच डासांचे प्रकार होणारे आजार, प्रतिबंधात्मक उपाय योजना ,डासांची उत्पत्ती व त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल? याबाबत सविस्तर माहिती सौ.सोनाली मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून दिली.
दुपार सत्रात मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर यांनी डासांची उत्पत्ती आणि त्यापासून होणारे आजार आणि डासनिर्मूलन याबाबत उपाय या विषयावर आधारीत पीपीटी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपात माहिती दिली.
शेवटी उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.












