कृषी सखींकडून शेतकऱ्यांना श्री पद्धतीने भात लागवडीचे मार्गदर्शन 

वेंगुर्ले : होडावडे येथे डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत ,मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालया मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध गावांमध्ये ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम रबविण्यात येत आहे, सदर कार्यक्रमाचा भाग म्हणून मौजे होडावडे येथे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दाखल झाल्या आहेत, भात पिकामध्ये उत्पादकता वाढीसाठी व मिथेन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून श्री (SRI) भात लागवड पद्धती ही महत्वाची समजली जाते, याकरिता कृषी सखींनी शेतकऱ्यांना श्री (SRI) पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले शिवाय कृषी सखींनी सामाजिक सलोख्यातून 2 एकर वरील भात लागवडीकरिता शेतकरी बांधवाना मदत केली याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रात्यक्षिकावेळी वासुदेव सावंत, नारायण पार्सेकर , मनीषा जाधव ,आनंदी जाधव, मैथिली जाधव, रंजना जाधव ,पूर्वा जाधव ,गीतांजली जाधव आणि प्रियतमा जाधव हे प्रगतशील शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच कृषी सखी प्रणाली गिम्हवणेकर, सिद्धी दिवेकर, प्राजक्ता चिंचकर, नेहा मोरे, कृष्णाली पोळ, श्रेया निंबाळकर यांनी SRI पद्धतीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.