नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
जैतापूर । राजन लाड : सागरी महामार्गावर जैतापूर कडील उतारावर एक टँकर अडकला आहे.
त्यामुळे मोठ्या वाहनांच्या वाहतूकिला अडथळा निर्माण होत आहे.
लहान चारचाकी वाहने मार्गक्रमण करू शकतात
मात्र मोठ्या वाहनांसाठी पुढील पर्यायी मार्ग सुचवले गेले आहेत:
१. रत्नागिरीहून देवगडकडे जाणारी वाहने : → धाऊलवली फाटा → जाकादेवी मार्ग → जेतापूर
२. जैतापूर पुलावरून येणारी वाहने : → धाऊलवली → जाकादेवी मार्ग धारतळे मार्गे रत्नागिरीकडे
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
क्रेन आणि जेसीबी मागविण्यात आले असून, टँकर हटवण्याचे काम लवकरच सुरू होईल.
रस्ता पूर्णपणे खुला होण्यास साधारणतः बारा वाजेपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे.
कृपया प्रवास करताना खबरदारी घ्या आणि पर्यायी मार्गांचा उपयोग करा.












