चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वालोटीनं.१ या शाळेत वालोटी गावातील स्व. लक्ष्मी भागोजी
कदम यांचे स्मरणार्थ त्यांचे पुत्र काशिराम भागोजी कदम, पांडुरंग भागोजी कदम व विष्णू भागोजी कदम यांनी शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या,पेन्सिल बॉक्स, पट्टी, कॅमलची कंपास पेटी, बॉलपेन व खाऊ इत्यादी साहित्याचे वाटप केले. तसेच शाळेच्या भौतिक गरजा ओळखून शाळेला ब्लू टूथ स्पीकर माईकसह शाळेचे मुख्याध्यापक संतोष कादवडकर यांच्याकडे सुपुर्द केला.
सदर शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्यासाठी वालोटी गावच्या सरपंच अवंतिका आंबेडे, उपसरपंच सचिन बामणे, वालोटी गावचे पोलीस पाटील शरद पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आराध्या कदम, दिक्षा कदम, साक्षी आंबेडे, प्रज्ञा कांगणे, साक्षी सुतार, सई कदम, अनुराधा महाडिक, अमृता सुतार, समिक्षा सुतार, सुभाष सुतार व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी काशिराम भागोजी कदम यांनी विद्यार्थ्याला खूप शिकावे, स्पर्धा परीक्षा, खेळ यात यश मिळवावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी शाळेच्या भौतिक गरजांची पूर्तता आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने होतात, असेच सहकार्य शाळेस कायम मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने वालोटी गावचे उपसरपंच व स्थानिक प्राधिकरण सदस्य सचिनजी बामणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी उपस्थित मान्यवर मंडळींचे तसेच देणगीदारांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षिका प्रिया हळदणकर, पदवीधर शिक्षक लक्ष्मण मते यांनी मुख्याध्यापक संतोष कादवडकर यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन केले.












