राजन लाड (जैतापूर )आज सकाळपासून नाटे -जैतापूर उतारावर अडकलेला टँकर दोन क्रेन आणि एका जेसीबीच्या साह्याने यशस्वीरित्या हटवण्यात आला.
या अपघातामुळे सुमारे चार तास अवजड वाहनांची वाहतूक ठप्प होती.
नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी सतत उपस्थित राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करत होते.
स्थानिक नागरिकांनीही वाहतूक जनजागृतीसाठी सहकार्य करून महत्त्वपूर्ण मदत केली.
सागरी पोलीस ठाणे नाटे चे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांचे आभार मानले आहेत.
कृपया पुढील प्रवास काळजीपूर्वक व सुरक्षितपणे करा.












