उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलैमधील दौरा

रत्नागिरी, दि. 30 : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे जुलै 2025 या कालावधीतील जिल्ह्यातील तालुका शिबीर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मोटार वाहन निरीक्षकांचा चिपळुण तालुका – 1, 8, 15, 22 आणि 29 जुलै, खेड तालुका – 3 आणि 17 जुलै, दापोली तालुका – 2 आणि 16 जुलै, मंडणगड तालुका – 9 जुलै, गुहागर तालुका – 23 जुलै, देवरुख – 30 जुलै, लांजा तालुका – 24 जुलै, आणि राजापूर तालुका – 25 जुलै 2025 तालुका शिबीर दौरा असणार आहे.

मोटार वाहन निरीक्षक हे जनतेच्या सोयीसाठी जिल्हा दौरा करतात. त्यावेळी शिबीर दौऱ्यांमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार कामे करण्यात येतील.