बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी घेतली मालवण पोलीस निरीक्षकांची भेट

जिथे गरज भासेल त्या-त्या वेळी बजरंग दल सामाजिक कार्यात पोलिसांसोबत असेल

मालवण | प्रतिनिधी : विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण पदाधिकारी यांनी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन नियुक्तीपर शुभेच्छा दिल्या. गरज भासेल त्या त्यावेळी सामाजिक कार्यात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत बजरंग दलाच्या कार्याविषयी माहिती दिली.

यावेळी विश्व हिंदू परिषद मालवण तालुकाध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल संयोजक श्रीराज बादेकर, सह संयोजक गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, प्रसाद हळदणकर, अमोल गावडे, देविदास परब, मुकुंद घाडीगावकर, दिनेश आंगणे, ललित चव्हाण, आनंद गावकर व इतर बजरंगी उपस्थित होते.

बजरंग दलाच्या कार्याचा विस्तार तसेच हिंदू राष्ट्र हिताच्या दृष्टीने बजरंग दल वेळोवेळी करीत असलेले सामाजिक कार्य, गोरक्षण तसेच हिंदू धर्म रक्षणाच्या दृष्टीने बजरंग दल करीत असलेले कार्य या सर्व कार्यावर चर्चा करण्यात आली. तसेच गरज भासेल त्या त्यावेळी सामाजिक कार्यात पोलिसांनाही सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बजरंग दलच्या वतीने मालवण पोलिसांना देण्यात आले.