सुकीवली, कुडोशी मध्ये विजेचा खेळखंडोबा , उपाययोजना करण्याची रा काँग्रेस ची मागणी

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील सुकीवली, कुडोशी गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा गेले काही दिवस सुरू असून या गावांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उपाययोजना व्हावी व विजपुरवठा सुरळीत व्हावा याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महावितरण च्या कार्यालयाला निवेदन सादर करण्यात आले

यावेळी खेड तालुका अध्यक्ष श्री विनायक निकम जेष्ठ नेते नारायण खेडेकर जेष्ठ नेते नारायण गोवळकर खेड तालुका खरेदीविक्री संघाचे संचालक श्री विश्वास सुर्वे कुडोशी ग्रामपंचायत सदस्य श्री संजय गोमले आदी ऊपस्थित होते