नांदगावात आगीत खाक घर उभारणीस जेसीजचा मदतीचा हात

खेड (प्रतिनिधी)  मुंबईमध्ये नोकरीनिमित्त राहणारे श्री. खोपटकर हे आपल्या मूळगावी होळी सणानिमित्त आले होते. ते घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्कीट होऊन नांदगाव जाखलवाडीतील खोपटकर याचे संपूर्ण घर बेचिराख झाले. खेड जेसीआयने याची तातडीने दखल घेत त्या कुटुंबातील सदस्यांना आधार दिला.

त्यावेळी जेसी आय खेडचे अध्यक्ष अमर दळवी, झोन ११ चे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, प्रथमेश खामकर, प्रमोद कांबळे, कपिल कोळेकर यांनी भेट दिली. त्यावेळी घरावर लागणारे पत्रे हे जेसीआय खेड देईल असा शब्द दिला होता. त्याची पूर्तता करण्यात आली.यावेळी जेसी अमर दळवी, अमोल क्षीरसागर, दीपक नलावडे, आनंद कोळेकर, अमित गरुड, मधुर पेठे उपस्थित होते.