भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर वेंगुर्ले येथे जल्लोष

वेंगुर्ले : प्रतिनिधी
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांची निवड जाहीर होताच वेंगुर्लेत भाजपा कार्यालया बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल, सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, नाथा मडवळ, संदीप देसाई, पप्पू सावंत, कमलेश गावडे, बिट्टू गावडे, संदीप धानजी, अभिषेक वेंगुर्लेकर, शेखर काणेकर, सत्यविजय गावडे, हेमंत गावडे, बागकर, श्रेया मयेकर, शितल आंगचेकर, वृंदा गवंडळकर, अंकिता देसाई, सौ. मयेकर, सौ. परब यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.