सावंतवाडी । प्रतिनिधी : माणगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगावच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षण अग्रणी पॅनेलचे उमेदवार माजी सैनिक चंद्रशेखर शिवराम जोशी हे प्रचंड मतांनी निवडुन आले. त्यांच्या या यशाबद्दल सैनिक पतसंस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्था व शालेय विकासात त्यांनी भरीव कामगीरी करत गेल्या ३ वर्षात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबवले आहेत. ते सैनिक पतसंस्थेचे विद्यमान संचालक म्हणुन योगदान देत आहेत. तसेच इंडीयन एक्स सर्व्हिसमेन लिग महाराष्ट्र डिस्टिक्ट सेंटर सिंधुदुर्ग या माजी सैनिकांच्या संस्थेच्या अध्यक्ष पदी देखील निवड करण्यात आली आहे.
याचे औचित्य साधुन सैनिक नागरी पतसंस्थेच्यावतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या वेळी संस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, व्हा. चेअरमन श्री. चंद्रकांत शिरसाट व विद्यमान संचालक श्री. दिनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. संतोष मुसळे, श्री. शामसुंदर सावंत, श्री. बाबू वरक, श्री. शांताराम पवार, श्री. गोपाळ बाईत, तज्ञ संचालक श्री. तातोबा गवस, श्री. पद्मनाभ परब व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ व कर्मचारी उपस्थीत होते.












