करुळ येथे कृषी दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन
यानिमित्त पार पडली कृषी दिंडी : दिंडीत वारकरी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
वैभववाडी l प्रतिनिधी : शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असेल तरच शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल. आपल्या गरजा या शेतीतून भागल्या पाहिजे. आणि शेतीतून उत्पन्न ही मिळाले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांचे योग्य नियोजन हवे. वैभववाडीत अनेक छोटी – मोठी धरणे आहेत. मात्र त्या तुलनेत तालुक्यात सिंचनाखालील क्षेत्र खूपच कमी आहे. योग्य प्रकारे पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतीतून समृद्धी निर्माण करावी. असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.
पंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग वैभववाडी ग्रामपंचायत करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त करूळ येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, जिल्हा बॅंक माजी संचालक दिगंबर पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रसाद देवधर, व प्रा. विवेक कदम, उपसरपंच सचिन कोलते, बाळा सुतार, प्रगतशील शेतकरी मंगेश कदम, महेश संसारे, विलास देसाई, उदय कदम, सुरेश सुतार, मंडल कृषी अधिकारी मंदावाड, मुख्याध्यापक दिपक घाडगे, कृषी अधिकारी कांता जाधव, प्रभाकर जाधव, अरुण कदम, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, राहुल शेळके, सचिन पाटील, यांच्यासह अधिकारी कर्मचारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर म्हणाले, सामाजिक व्यवस्थेने राजकीय व्यवस्थेला कधीतरी सांगायला हवे त्यांनी नेमके काय करायला हवे. सगळ्यात जास्त दुःख हे शेतकरी भोगत असतो. मात्र ते कुठेही दाखवले जात नाही. तो उत्पादक आहे. शेतकरी जगला तर तुम्ही जगाल त्यामुळे त्याचा भाव करू नका. बाजारात काय विकले जात आहे. काय शाश्वत आहे. ते पिकावण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवता आली पाहिजे. आपल्या गरजा भागतील इतकं तरी आपण पिकवतो का? माझ्या घरच्या गरजा काय आहेत. हे ओळखून ते पिकावण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण पिकवलेले उत्पादन विकण्याची आपल्याला लाज वाटता कामा नये. असेही त्यांनी सांगितले. बीडीओ रामचंद्र जंगले, पो. नि. सोनवलकर, सरपंच नरेंद्र कोलते, प्रा. विवेक कदम, उमाकांत पाटील, निरंजन देशमुख, ऍड. अजितसिंह काळे घाटगे सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी मंगेश कदम यांचा शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यात भात पीक स्पर्धेतील विजेते ऍड अजितसिह काळे, सुनील पवार, नवलू झोरे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामसेवक सचिन कांबळे, सचिन चव्हाण, रवींद्र गोसावी यांचा तसेच कृषी सहाय्यक साईप्रसाद तेली, चंद्रशेखर कदम, स्नेहा गेडाम दीपक म्हसेकर, व रोजगार सेवक वैष्णवी नकाशे, विनायक गुरव, दीपक सरवणकर, यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आपत्ती काळात नेहमीच धावून जाणाऱ्या करूळ येथील सह्याद्री रक्षक टीमचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य वृक्ष दिंडीने करण्यात आली. यामध्ये गावातील वारकरी, शेतकरी, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रानभाजी प्रदर्शन मांडण्यात आले होते. रानभाज्यांचे आहारातील महत्व, त्याचे औषधी गुणधर्म सांगणारी माहिती कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे विद्यार्थी सांगत होते.
कृषी दिनाचे औचित्य साधून करूळ येथे तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले व अधिकारी कर्मचारी यांनी औत व पॉवर ट्रिलर हाती धरला. तर भात लावणीचा सुद्धा आनंद घेतला. विशेष सहकार्य शिक्षक विलास गुरव, आनंदा जाधव, अविनाश कानडे, रमाकांत गोरे, दत्ताराम पाटील, नागेश पांचाळ, हेमंत जाधव, जगदीश पांचाळ, प्रदीप कदम यांचे लाभले. प्रास्ताविक कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील अर्चना पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.













