कुवळे-रेंबवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे सुहास राणे यांची बिनविरोध निवड

शिरगाव (प्रतिनिधी) –     देवगड तालुक्यातील कुवळे-रेंबवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे सुहास राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी देवगड तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.

या वेळी सरपंच सुभाष कदम, मावळते उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, रोहिणी लाड, उर्मिला परब, सीआरपी अमृता लाड, पोलीस पाटील रोहित कदम, ग्रामसेवक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप पवार, रेंबवली बूथ अध्यक्ष सुनील वळजू, कृषी सहाय्यक अमोल इंढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त उपसरपंच सुहास राणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.