सुपारीवर काढले विठ्ठल मूर्तीचे चित्र 

नाधवडेतील सचिन मेस्त्री या युवा कलाकाराचे होतेय सर्वत्र कौतुक

वैभववाडी l प्रतिनिधी :     नाधवडे गावातील युवा कलाकार सचिन सदानंद मेस्त्री याने एक इंचाच्या सुपारीवर विठ्ठलाची हुबेहूब मूर्ती साकारली आहे. आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र आषाढ वारीची चर्चा सुरू असताना आणि सर्व भक्तगन विठ्ठल नामात गुंग असताना सचिनने दाखविलेली कला आज सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या तरुण कलाकाराने एक इंचाच्या सुपारीवर पाच सूत या आकारात पोस्टर कलर चा वापर करून विठ्ठलाची मूर्ती साकारून आपली विठ्ठलाची श्रद्धा व्यक्त केली आहे. एका तासात त्याने हे पेंटिंग केले असून त्याच्या या प्रयत्न बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.