सरंद येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

गौरव पोंक्षे l माखजन :    चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली येथील कृषी कन्यानी संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला.यावेळी कृषी दिंडी व वृक्ष लागवड करण्यात आली.

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे डॉ भागडे,प्रा डॉ. चोरगे यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम येथील माखजन इंग्लिश स्कूल येथे राबवण्यात आला.

यावेळीकृषी कन्या साक्षी लोणकर, श्रुतिका काळे, जानवी पाटील,रुचिता पाटील अस्मिता जाधव,सानिका खाडे, आदी कृषी कन्या उपस्थित होत्या तर

संस्था अध्यक्ष किशोर साठे,अन्य संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.