गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र महाराज संस्थानात कार्यक्रम 

कणकवली : गुरुपौर्णिमेनिमित्त प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात गुरुवार १० जुलै रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वा. समाधीपूजन, काकडआरती, जपानुष्ठान, सकाळी ७ वा. पाद्यपूजा-अभिषेक, १०.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम, सायं. ७ वा. धुपारती, ८ वा. दैनंदिन आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातर्फे करण्यात आले आहे.