राजापूर (प्रतिनिधी): गेले अनेक महिने रिक्त असलेल्या राजापूर तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते जितेंद्र खामकर यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे टिळक भवन येथे झालेल्या मुलाखती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पदावर खामकर यांची नियुक्ती करत तसे पत्र त्यांना दिले आहे.
या पदासाठी प्रदेशाध्यक्ष सकपाळ व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. काँग्रेसच्या माजी आमदार ऍड. हुस्नबानू खलिफे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. जितेंद्र खामकर यांच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने राजापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद हे रिक्त होते. या निवडीनंतर पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण तालुका कमिटी तयार करून प्रदेश काँग्रेसकडे पाठवायची आहे अशा सूचना प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. खामकर यांचे अभिनंदन होत आहे.












