गुरुवारी दुपारी जगबुडी, कोदवली नद्यानी ओलांडली इशारा पातळी

रत्नागिरी : सातत्य नसलं तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज अलर्ट चा इशारा मुंबईच्या वेधशाळा कडून देण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी रत्नागिरीच्या पाटबंधारे मंडळाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या नदीपातळी अहवालानुसार दुपारी 2 वाजता खेड तालुक्यातील जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वर वाहत होती. दुपारी 2 वाजता जगबुडीची नदी पातळी 5.40 मीटर इतकी होती तर राजापूर तालुक्यातील कोदवली ही नदी इशारा पातळीवर वाहत होती. नदी पातळी 5.70 मीटर इतकी होती. जिल्ह्यातील उर्वरित वाशिष्टी, शास्त्री, सोनवी, काजळी, मुचकुंदी आणि बावनदी मात्र आपल्या नियमित पातळीवरून वाहत होत्या.