मुंबई: पुढील आठवड्यात पण पावसाचा जोर रत्नागिरी जिल्ह्यात कायम राहणार असून 3 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला मुंबई वेधशाळा कडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
20 मे पासून सक्रिय झालेल्या पाऊस पावसानं आता चांगलाच बसस्थान बसवला आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. त्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्याला मुंबईच्या वेधशाळा कडून 7 जुलै पर्यंत हवामानाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे 3, 4, 5, 6 आणि 7 जुलै या कालावधीत रायगड,रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट या भागामध्ये तसेच कोल्हापूर घाट येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.













