लायनेस्टिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील प्रांताचा शेवटचा कार्यक्रम सोलापूर येथे दिनांक २९ जून रोजी अतिशय उत्साहात पार पडला.यावेळी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी ला एकूण २० पारितोषिके मिळाली.
अध्यक्ष MJF लायन गणेश धुरी यांना प्लॅटिनम ॲवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.व लिओ श्रेयस रसाळ यांना ही प्लॅटिनम ॲवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. लायन्स क्लब रत्नागिरी ने व लिओ क्लब ऑफ रत्नागिरी ने या वर्षात विभागीय, उपविभागीय,प्रांतीय तसेच बहुप्रांतीय स्तरावर मिळून एकूण ६८ पारितोषिके मिळवून प्रांतातच नव्हे तर बहुप्रांतात सुद्धा आपले नाव सन्मानाने उंचावले.
आत्ता पर्यंत १००० पेक्षा जास्त सेवाकार्य करत एक नवा विक्रम च क्लबने नोंदवला.
52 वर्षांची परंपरा असलेल्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चा 2024-25 या लायनेस्टीक वर्षासाठी पदाधिकारी म्हणून जूलै महिन्यात पदभार स्वीकारला तो रत्नागिरी मधील नामवंत व्यवसायिक लायन गणेश धुरी,लायन अमेय विरकर आणि लायन विशाल ढोकळे यांनी. अनेक प्रकारची सेवाकार्य करताना यावर्षी प्रथमच निधी संकलनाचे दोन कार्यक्रम केले.प्रथमच एकूण १४ फाईल बहुप्रांतीय परिषदेत पुरस्कार प्राप्त ठरल्या.थिबा पॉईंट येथील मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर कायमस्वरूपी आयर्लंड बांधण्यात आले.सेवा सप्ताह साजरा केला…सेवा सप्ताह करताना आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेल्या ८ ग्लोबल कॉझेस नुसार आठ वेगवेगळी सेवाकार्य केली आणि विशेषतः त्या ८ विषयांवर रोज एक परिपत्रक काढले…..सर्व Days to be Observed आणि माजी प्रांतपाल सन्मान सुद्धा विविध सेवाकार्य करत साजरे केले..सेवाकार्य करत असताना भव्य असा रानभाज्या महोत्सव प्रथमच क्लब कडून आयोजित केला गेला ज्या मध्ये विशेष करून गावातील महिलांना एकत्र केलं आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत हा महोत्सव पार पडला,रोटरी क्लब,उपरी लायन्स क्लब, तसेच झोन मधील इतर लायन्स क्लब सोबत एकत्र येऊन अनेक सेवाकार्य केली….महिला सक्षमीकरण आणि संरक्षण या विषयावर प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनपर व्याख्याने यांची मालिका आयोजित केली….. एका गरीब गरजू डायबिटीस पेशंट चा पाय काढल्यामुळे त्यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली..तसेच एक अतिशय उपयुक्त असे कायमस्वरूपी सेवाकार्य करण्यात आले,लाईट नसलेल्या घरात कुटूंबासाठी कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था क्लब कडून करण्यात आली…3000 पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आले…. रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे अडकलेल्या 800 हून अधिक प्रवासांना खिचडी वाटप करत गरजू गरिबांना लायन्स शिधा चे वाटप केले तसेच दररोज 10 गरिबांना वर्षभर रोज जेवण वितरीत केले गेले…बंधारा बांधणे,सायक्लेथॉन, मॅरेथॉन,आय ग्लास कलेक्शन बॉक्स बसवणे, शाळेत कपाट देणगी स्वरुपात देणे,ॲक्यूचेक मशीन ग्रामपंचायतीना देणे,महिला बचत गटांच्या प्रदर्शनात विविध सेवाकार्य करणे, पर्यावरण विषयक सेवाकार्य,आय बॉल कलेक्शन करणे, विविध कार्यशाळा घेणे अशी समाजोपयोगी सेवाकार्य क्लब कडून करण्यात आली.
लायन्स नेत्र रूग्णालयामार्फत व डायलिसिस सेंटर द्वारे सुद्धा गरजू गरीब लोकांना मोफत व अत्यल्प दरात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
रत्नागिरी मधे प्रथमच दिव्यांग मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या त्यात लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चा सहभाग होता..
रत्नागिरी क्लब च्या २०२४-२५ या वर्षाच्या टिमला सर्व लायन्स सदस्यांनी,देणगीदारांनी, काही संस्थांनी,पत्रकारा वर्गाने खुप छान सहकार्य केले.सर्व जेष्ठ सदस्यांनी सुद्धा नेहमीप्रमाणेच उत्तम मार्गदर्शन व सहकार्य केल्याने हे वर्ष भरघोस यश देणारे ठरले असे अध्यक्ष गणेश सचिव विशाल व खजिनदार अमेय यांनी स्पष्ट केले.कुठलेही कार्य हे टिम वर्क शिवाय होत नाही.लायन्स क्लब रत्नागिरी ला मिळालेले हे भरघोस यश हे टिम वर्क मुळेच मिळाल्याचे या तिघांनी ही नमूद केले
नव्यानेच सुरू झालेला लिओ क्लब सुद्धा अप्रतिम अशी साथ देत आहे……व स्वतः सुद्धा स्वतंत्र रित्या सेवाकार्यांचे नियोजन करत आहेत…… त्यांनी सुद्धा आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त सेवाकार्य करत आपले नाव प्रांतात एका उंचीवर नेऊन ठेवले आहे…..










