दारूच्या नशेत न्यायदंडाधिकाऱ्यांच्या इमारतीत गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

Thumb - 13

रत्नागिरी : प्रतिनिधी
दारुच्या नशेत रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर आरडा-ओरडा करणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 3 जुलै रोजी दुपारी 12.15 वा. सुमारास करण्यात आली.
अशोक वसंत मालप (53,रा.पानगलेवाडी पावस,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल अभिजित पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी संशयित हा दारुच्या नशेत रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर आरडा-ओरडा करताना मिळून आला. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 85 (1)(2) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 110/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.