रानगव्याच्या धडकेत मळगावातील युवक जखमी

सावंतवाडी : सावंतवाडी रेडी मार्गावरील माजगांव येथील कै. भाईसाहेब सावंत समाधीजवळ अचानक गवा रस्त्यावर येऊन दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार सागर प्रभाकर मळगांवकर ( ३६, रा. मळगांव आंबेडकरनगर ) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तो जाग्यावरच पडून होता. त्यानंतर स्थानिकांनी व तेथे जमलेल्या काही वाहनधारकांनी रिक्षात घालून याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.