कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या ‘आनंद शिशु वाटिका’मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

चिमुकल्यांनी सादर केली व्यासमुनींची नाटिका

​सावंतवाडी: अनौपचारिक शिक्षणासोबतच बालमनावर उत्तम संस्कार घडविणाऱ्या येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल संचालित ‘आनंद शिशु वाटिका’ शाळेमध्ये आज गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

​कार्यक्रम प्रसंगी हिंदू संस्कृतीतील महान ऋषी व ग्रंथकार महर्षी व्यास यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी शिशु वाटिकेतील चिमुकल्यांनी महर्षी व्यास यांची हुबेहूब वेशभूषा साकारून एक सुरेख नाटिका सादर केली, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

​गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा | > गुरु साक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुदेव नमः ||
​या श्लोकाचे पठन करत आणि “गुरु ईश्वर तात माय, गुरु विना जगी थोर काय” या भावपूर्ण प्रार्थनेच्या माध्यमातून सर्व बालचमूंनी आपली पहिली गुरू असणाऱ्या आईला तसेच आपल्या गुरुवर्यांना मनःपूर्वक वंदन केले. लहान वयातच मुलांमध्ये आदरभाव व भारतीय संस्कृतीची रुजवणूक करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.