ज्ञानदीप बालभवन (सीबीएसई )मोरवंडे बोरज येथे दुमदुमली विठू नामाची पंढरी–

खेड । प्रतिनिधी मोरवंडे-आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित दिंडी सोहळा बाळगोपाळांनी विठू नामाच्या गजरात उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात ज्ञानदीप बालभवन व ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी सहभागी झाल्यामुळे हा सोहळा पाहून प्रत्यक्ष बालवारकऱ्यांची पंढरीच उतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. प्रशालेतील विद्यार्थी कु. स्वर्ण नामुष्ठे, श्रुत्व चांदीवडे, चैतन्य काणेकर, शरण गजमल या विद्यार्थ्यानी विठ्ठलाचा पोशाख परिधान केला होता तर कुमारी त्रिशा पाडावे, श्राव्या ढेकणे, अवनी खताते, मुक्ता काते, सान्वी कडू
या विद्यार्थिनींनी देवी रखुमाईचा पोशाख परिधान केला होता. तसेच विद्यार्थी संत तुकाराम, संत एकनाथ, वासुदेव, संत जनाबाई, संत मीराबाई यांच्या वेशभूषेत आले होते आणि काहींनी वारकरी पोशाख, नऊवारी साडी व परकर पोलक परिधान केले होते.
प्रशालेत बालगोपाळांनी विठू नामाचा गजर करीत मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा केला. पायी हळूहळू चाला मुखाने विठ्ठल बोला, जय जय विठोबा रखुमाई, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, टाळ वाजे नाळ वाजे इत्यादी भजने वाद्याच्या तालावर म्हणण्यात आली. विठ्ठल नामाच्या जयघोशात अवघा परिसर दुमदुमला होता. प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी मोठ्या भक्तीभावाने हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळा साजरा केला. प्रशालेतील मैदानामध्ये मोठ्या भक्ती भावाने टाळ मृदुंगाच्या गजरात, भजन गात मृदंगाच्या तालावर नाचत सर्वांनी सहभाग घेतला. यामुळे सर्व शालेय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानदीप बालभवन व ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य माननीय श्री .भरत मोरे यांनी मार्गदर्शन केले. बालभवन मधील शिक्षिका जयश्री शिरसाठ, दर्शना गोरिवले, सौ जानवी पाटील, श्रीमती कस्तुरी चोनकर व सौ लीना मेस्त्री तसेच ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्ञानदीप महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री माधव पेठे, सीबीएसई स्कूलचे नियामक मंडळ चेअरमन प्रफुल्ल महाजन व संस्थापक सरचिटणीस श्री प्रकाश गुजराथी सर विविध विभागाचे चेअरमन श्री दीपक लड्डा चंदनशेठ पाटणे अनिल शिंदे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी व सभासद यांनी शुभेच्छा दिल्या.