गौरव पोंक्षे l माखजन : चिपळुणातील प्रभात रोडची सध्या चाळण झाली आहे.प्रभात रोडच्या मुंबई गोआ महामार्गापासून ते नारायण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत चा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.चिखल पाण्याने खड्डे भरून गेले आहेत.येथून जाणाऱ्या प्रत्येकाला रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच पाहावे लागत आहे.
सुमारे ४०० मीटर एवढ्या रस्त्याचे डांबरीकरण यावर्षी न झाल्याने येथील रहिवाशांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.पावसाळ्यात खड्यात चिखल पाणी तर पावसाळा गेला की येथील रहिवाशांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या धुळीवर साधे पाणी मारण्याचे सौजन्य देखील चिपळूण नगरपरिषद दाखवत नसल्याने येथील नागरिक बेजार झाले आहेत.उन्हाळ्यात तर प्रत्येकाच्या घरात हात लावू तिथे धूळ अशी अवस्था होत असल्याने,शासनाच्या उदासीनतेवर येथील नागरिक पुरते नाराज आहेत.
चिपळूण शहरातील अनेक रस्ते सुधारले पण प्रभात रोड च्या या दुरावस्थेकडे शासनाला व तथाकथित लोक प्रतिनिधी ना लक्ष द्यायला वेळ नाही.
एखाद्या चारचाकी गाडीचा प्रॉब्लेम नेमका काय आहे हे कच्च्या रस्त्यावर चालवल्यावर कळते,अशा वेळी मेकॅनिक प्रभात रोड चा आधार घेत आहेत.प्रभात रोड ची दुरवस्था सध्या चिपळुणात सर्वश्रुत झाली आहे.मात्र राज्यकर्त्यांकडून व लोकप्रतिनिधींकडून ही गोष्ट नजर अंदाज केली जात आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे चिखल पाणी साचल्याने दिसायला लागल्यावर यामध्ये गिरीट टाकले जाते. व तात्पुरती मलमपट्टी केली जाते.परंतु गाड्या जाऊन जाऊन ते सगळं पुन्हा खड्यातून बाहेर येत.पावसाळा गेला की सुखलेलं गिरीट रहिवाशांच्या घरात जात.
या सर्व गंभीर बाबींकडे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.पावसाळा जाताच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.












