कुणबी महिला मंडळ कार्यकारणी सभेत महत्वपूर्ण निर्णय
संतोष कुळे lचिपळूण : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी महिला मंडळ कार्यकारणीची सभा दि.५ जुलै रोजी परेल वाघे हॉल येथे सौ.दिपिका आग्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत विषयपत्रिकेप्रमाणे विषय घेण्यात आले. मासिक सभेत एक महत्त्वपूर्ण घेण्यात आला आहे. आर.टी.ई. (RTE) शिक्षण हक्क कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचा विषय महत्वपूर्ण असून त्यावर सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. आपल्या समाजातील कोणतेही मूल फक्त आर्थिक परिस्थितीमुळे शाळे बाहेर राहू नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे अध्यक्षा दीपिका आग्रे यांनी सांगितले.
मुलांचे हात कामासाठी नव्हे, तर पुस्तके आणि पेनासाठी असावेत हे आपण सगळ्यांनी ठरवायला हवे.आपण पुढे आलो आणि माहिती दिली, योग्य वेळी फॉर्म भरले तर एखाद्या आयुष्याला दिशा मिळू शकते.
कारण शिक्षण देणे म्हणजे एक पिढी घडवणे आहे. आणि समाज बदलण्याची खरी सुरुवात आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
कुणबी महिला मंडळाच्या वतीने “सर्व्हायविकल कॅन्सर जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर” घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
हे उपक्रम यशस्वी व्हावेत, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत, यासाठी आपल्या सहकार्याची आणि सहभागाची नितांत गरज आहे.
संघटन म्हणजेच ताकद आणि ही ताकद आपल्या एकतेत आहे.
त्यासाठी संघटन बांधणी महत्त्वाची आहे म्हणून महिला मंडळ संघटन बांधणी करण्यास जास्तीत जास्त मेहनत करु या सभेत ठरविण्यात आले.
सभेत नवनिर्वाचित गुहागर महिला मंडळाचा ’संविधानाची प्रास्ताविका’ व पुष्पगुच्छ ऐवजी ’मी सावित्री’ हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सभेला महिला अध्यक्ष सौ दीपिका संदीप आग्रे, उपाध्यक्ष सौ सुहासिनी गोणबरे, उपाध्यक्ष सौ. स्मिता गोंधळी, उपाध्यक्ष सौ करुणा पाटील, उपाध्यक्ष सौ स्नेहा खापरे, सरचिटणीससौ प्रतीक्षा निवाते, सहचिटणीस सौ स्वप्ना गोरीवले , सहचिटणीस सौ संजना भोईर, सहचिटणीस सौ दिपीका मौले, सहचिटणीस सौ अश्विनी बाईत , खजिनदार कु. निलाक्षी लोंढे आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
सर्व उपस्थित गुहागर महिला मंडळ कार्यकारणीचे व मध्यवर्ती महिला मंडळाच्या कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.













