वनविभागाच्या जलद कृती दलाची कार्यवाही
सावंतवाडी : कोंडुरा-देऊळवाडी येथे चौघा शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. परिसरातील पाण्याच्या पंपासाठी बनविण्यात आलेल्या केबिनमध्ये बिबट्या लपून राहिला होता. स्थानिक तरुण हर्ष मुळीक आणि सुधीर मुळे यांच्या निदर्शनास आला होता. दोडामार्ग वरून बिबट्याला पकडण्यासाठी खास पिंजरा मागविण्यात आला. वनविभागाच्या जलद कृती पथकाच्या अथक प्रयत्नाअंती बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे स्थानिकांसह वनविभागानेही सुटकेचा श्वास सोडला. याकामी स्थानिक ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले.











