चिपळूण- रोटरी क्लब चिपळूण गेले 51 वर्ष सामाजिक,वैद्यकीय, शाळा, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये अग्रेसर असं नाव, म्हणूनच सामाजिक बांधिलकीची एक अनोखी पाऊल उचलत विशेष मुलांसाठी ‘सितारे जमीन पर’ या प्रेरणादायी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन अतिथी थिएटर मध्ये आयोजित केले होते. रोटरी क्लब चिपळूणच्या वतीने समाज उपयोगी उपक्रमाच्या अनुषंगाने जिद्द मतिमंद मुलांची शाळा आणि जयदीप मोने उद्योग केंद्र चिपळूण या विशेष विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांना सितारे जमीन पर हा विशेष मुलांनी अभिनय केलेला सुप्रसिद्ध अभिनेते अमीर खान यांचा चित्रपट दाखवण्याचा सोहळा आयोजित केला होता. या उपक्रमा मागचा उद्देश म्हणजे या मुलांमध्ये आत्मविश्वास, स्व- प्रेरणा आणि सकारात्मक विचारांचे बीज रोवणे.
सितारे जमीन पर हा चित्रपट खास अशा मुलांच्या जीवनात रंग भरतो, त्यांना समजून घेतो आणि त्यांच्या दडलेली चमक जगासमोर आणतो.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल असा विश्वास क्लबने व्यक्त केला आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर, प्रो. चेअरमन राजेश ओतारी -सचिव, डॉ. माधव बापट -प्राचार्य डी.बी.जे. कॉलेज, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, DG प्रसाद सागवेकर, नितीन देवळेकर तसेच या कार्यक्रमासाठी निवृत्त उपजिल्हाधिकारी शंकर पालशेतकर हे देखील उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्यांनी आमचे विद्यार्थी नृत्य, नाट्य, अभिनय करतातच मात्र हा चित्रपट पाहिल्यामुळे त्यांच्या अंतर्गत उर्मिला नक्कीच उत्तेजना मिळवून त्याच्यात त्यांच्यातील कला अजून उभारून येईल आणि आपण इतरांपेक्षा कमी नाही ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊन त्यांचे मनोधैर्य उंचावेल. कदाचित हा चित्रपट बघितल्यामुळे शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात चित्रपटात काम करण्याची उर्मी निर्माण होईल आणि हेच आजच्या या सोहळ्याचे फलित झाले असे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमासाठी शाळेमधून सुनील शिंदे मुख्याध्यापक, उमेश कुचेकर विशेष शिक्षक, कीर्ती गायकवाड, प्रसन्ना रेडीज, प्रकाश बलाढ्ये, रेखा खंडजोडे, सुनील मयेकर आदी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अतिथी थिएटर यांचे विशेष सहकार्य लाभले.








