पोदार प्रेप मध्ये आषाढी एकादशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साह पूर्ण वातावरणात साजरी

पोदार प्रेपने आषाढी एकादशी ‘ जीवनातील परस्पर संबंध आणि उत्सव’ या थीमवर साजरी केली.आषाढी एकादशीच्या शुभदिवशी, मुलांनी विविध आकर्षक आणि सांस्कृतिक समृद्ध उपक्रमांमध्ये उत्साहीपणे सहभाग घेतला. या उत्सवामध्ये कथा ऐकणे, वारी नृत्याची चैतन्यपूर्ण सादरीकरण, वारी परंपरेची नाटिका, उपासाला खाल्ले जाणारे पदार्थ ओळखणे, पारंपरिक फुगडी नृत्याचा आनंद घेणे यांचा समावेश होता. या अनुभवांनी मुलांना या महत्त्वाच्या सणाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला आनंददायक आणि अर्थपूर्ण पद्धतीने जोडले.
NEP-2020 मध्ये दर्शविल्या प्रमाणे मुलांचा पंचकोश ला चालना देणारे उपक्रम आषाढी एकादशी च्या निमित्ताने साजरे झाले.
ह्या उपक्रमाचे महत्व शिक्षक वर्गानी मुलांना पटवून दिले.