प्रा वैभव खानोलकर यांचा अध्यापक भास्कर पुरस्काराने होणार गौरव

वेंगुर्ले l प्रतिनिधी :फरा प्रतिष्ठानचा अध्यापक भास्कर पुरस्कार खानोली गावचे सुपुत्र प्रा वैभव खानोलकर यांना गुरूपौर्णिमे दिवशी प्रदान करून त्याचा गौरव वेंगुर्ले कालेलकर सभागृहात करण्यात येणार आहे.

प्रा.वैभव खानोलकर हे शिक्षण क्षेत्रातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व, विद्यार्थी वर्गात सर्वात आवडते शिक्षक म्हणून त्यांच्या कडे आजही विद्यार्थ्यांचा ओढा असतो.

मराठी विषयावर असणारे कमालीचे प्रभुत्व,त्याच बरोबर विविध विषयांचा व्यासग, शिकवण्याची पद्धत या बरोबरच त्यांच्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना भावतात. मराठी, हिंदी, इतिहास या विषयांसह राज्यशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयात एम ए ही पदवी एम् फिल,बी.एड्.ग्रथालय शास्त्र या सह वकिलीची पदवी त्यांनी मिळवली आहे.

वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन,काव्यलेखन, चित्रकला, नृत्य, अभिनय,खेळ आदी क्षेत्रात खानोलकर सर मुलांना संधी देतात आणि विशेष म्हणजे सगळ्या स्पर्धेत त्याची मुले चमकतात.

ते स्वतः उत्तम वक्ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह,गोवा, कर्नाटक आणि राज्यात त्यांना युवा व्याख्याते म्हणून निमंत्रित केले जाते, दशावतारी कलाक्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. भजनी कलाकार, दशावतार कलावंत अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या त्यांनी घेतलेल्या अभ्यासपूर्ण मुलाखतीतुन त्याचा अभ्यास कळतो.

समाजाच्या विविध विषयांवर केलेले त्यांचे लिखाण सुध्दा त्याच्या बोलण्या इतके प्रभावी असते.

लोककलेचे समृद्धी आपण जपली पाहिजे या भावनेतून त्यांनी लिहिलेल्या सडेतोड लेख अनेक कलाकाराना प्रेरणा देतात, स्पष्टवक्तेपणा, अभ्यास पुर्ण मांडणी आणि त्याची भाषाशैली यामुळे त्यांचे लेख वाचनीय तर असतात त्याच सोबत नाविन्यपूर्ण असतात.

त्यांचे सुत्रसंचालन हे सुध्दा तितकेच प्रभावी असते अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, डॉ प्रकाश आमटे, अभिनेत्री वर्षा उसगावकर,सुनिल गोडबोले, पद्मश्री नयना आपटे,विजय पाटकर, दिंगबर नाईक, किशोरी आंबिये, अरूण नलावडे,अनिल गवस, आदी सिनेस्टारनी त्यांच्या प्रभावी सुत्रसंचलनाची दखल घेत त्याची वाहवा केली आहे.या सोबत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार संजय राऊत या सारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवेदनाचे कौतुक केले आहे पं.अजित कडकडे, मुग्धा वैशंपायन आदी दिग्गज कलाकारांच्या सोबत त्यांनी निवेदन करत रसिक मनाचा वेध घेतला आहे.

एक शिक्षक म्हणून कार्यरत असतात विविध क्षेत्रातील चौफेर सफर करताना विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्रा वैभव खानोलकर यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल अध्यापक भास्कर पुरस्कार देऊन गौरवताना या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, गौरव लोगो, गौरव ग्रंथ,शाल आदी असणार आहे.

अध्यापन भास्कर पुरस्कार खानोलकर यांना जाहीर झाल्याबद्ल विविध स्तरांतुन त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.