माडखोल येथील साई पालखीचे आ. केसरकर यांच्या निवासस्थानी आगमन

गुरुपौर्णिमेनिमित्त पादुका पूजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील प्रती शिर्डीची पालखी दाखल झाली. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी श्री साईंची पालखी केसरकर यांच्या निवासस्थानी येते आणि यावेळी केसरकर दांपत्याकडून पादुका पूजन केले जाते.
बुधवारी सायंकाळी श्री साईंची पालखी केसरकर यांच्या निवासस्थानी पोहोचली. यावेळी दीपक केसरकर आणि त्यांच्या पत्नी पल्लवी केसरकर यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला आणि पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर साईंची महाआरतीही उत्साहात पार पडली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दत्ता सावंत, शुभांगी सुकी, ॲड. निता कविटकर, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, किरण नाटेकर, दत्ताराम वाडकर, अर्चित पोकळे, सुजित कोरगावकर यांच्यासह अनेक साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.