कृषी सखींकडून होडावडे गावामध्ये कृषि माहिती केंद्राची स्थापना

 

वेंगुर्ले । प्रतिनिधी : तालुक्यातील होडावडे येथे डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत , उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध गावांमध्ये ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे, सदर कार्यक्रमाचा भाग म्हणून मौजे होडावडे येथे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दाखल झाल्या आहेत, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या माननीय सहयोगी अधिष्ठाता डाॅ.विजय दळवी सर तसेच सहाय्यक विस्तार विशेष तज्ञ डाॅ. गिरीष उईके सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि माहिती केंद्र उभारण्यात आले. या माहिती केंद्रामध्ये माती परिक्षना पासून वेग वेगळ्या पिकांवर आढळणारे रोग , किडी व त्यावरील उपाययोजना इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी सिधुदुर्ग जिल्हा बॅंक अधक्ष मा.श्री. मनीषजी दळवी , होडावडे गावच्या सरपंच या.सौ.रसिका केळूसकर , उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे माननीय सहयोगी अधिष्ठाता डाॅ.विजय दळवी सर तसेच तसेच सहाय्यक विस्तार विशेष तज्ञ डाॅ. गिरीष उईके सर , श्रीमती नेत्रा सावंत तलाठी ,ग्रामपंचायत सदस्य होडावडे व १०० हून अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी डाॅ. विजय दळवी सर (भात संशोधक ) यांनी शेतकरी बांधवांना भात शेतीबद्दल मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवाना मदत केली याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मा.श्री.मनीषजी दळवी यांनी कृषी सखी प्रणाली गिम्हवणेकर, सिद्धी दिवेकर, स्नेहल फडतरे , प्राजक्ता चिंचकर, नेहा मोरे, कृष्णाली पोळ, श्रेया निंबाळकर यांना पुढील वाटचालिकरता शुभेच्छा दिल्या.