चिपळूणचे स्विमिंग टॅंक ची पुन्हा दुरावस्था; भाजपकडून पंचनामा

चिपळूण (प्रतिनिधी) : नगरपालिकेने प्रचंड खर्च करून, दिमाखात ओपनिंग केले, परंतु त्याला पाणी पुरवठा करणारी नगर पालिकेची पाईपलाईन गेले अंदाजे २ महिने फुटली आहे, त्यामुळे सर्व बाथरूम, टॉयलेट बंद अहेत, पाणीच नसलेमुळे त्यामध्ये प्रचंड घाण साठून दुर्गधी झाली आहे, त्याकडे ठेकेदाराचे व नगर परिषद चे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत काही पोहणाऱ्या व्यक्तींनी भाजपकडे तक्रार केली. त्यानंतर भाजप शिष्ट मंडळाने स्विमिंग पूल येथे पाहणी करून दुर्गंधी व अस्वच्छता याचा पंचनामा केला.
यानंतर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती ची माहिती दिली. पुढील दोन दिवसात सर्व स्वच्छ होणार व रोज तेथील स्वच्छतेचा अहवाल घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष शशिकांत मोदी, आशिष खातू, रसिका देवळेकर, वैशाली निमकर, सारिका भावे, शीतल रानडे,विनायक वरवडेकर, अभय चितळे, मधुकर निमकर, निनाद आवटे, श्री. बेलवलकर, अभिषेश राजापूरकर, फैज दळवी, प्रदीप शितप, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते.