चिपळूण (प्रतिनिधी) : पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय धामणंद येथे शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक श्री. खाडे, कसबे, पोरे, भोये, भांदिगरे, पाटील, सावंत, आरती उतेकर, सुजाता म्हापदी यांचे औक्षण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुचे महत्त्व विशद केले. सक्षम तांबे, वैधवी मोहिते, ध्रुवी चांदे, अंकुश सुतार, श्रावणी जाधव, अबोली मोहिते, पवार, वैदही उत्तेकर, आर्या उत्तेकर, प्राजक्ता मोहिते, दीक्षा खरात, तन्वी कदम, आयुष पालांडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी गुरु आणि शिष्य याविषयी माहिती प्राध्यापक पोरे, अभिजित भोये यांनी गुरुचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मोहिते, आर्या उत्तेकर या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्राध्यापक कसबे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












