अखेर उक्ताड रस्त्याची दुरुस्ती; साजिद सरगुरोह यांच्या रस्ता रोको आंदोलनाला यश

दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-गुहागर मार्गावरील उक्ताड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केली होती. याबाबत ‘प्रहार’ नेही वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे.
चिपळूण गुहागर मार्गावरील उक्ताड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणेही अवघड झाले आहे. खड्ड्यामुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्याची तातडीने दोन दिवसात दुरुस्त करण्याची मागणी केली होती, अन्यथा नागरिकांना घेऊन रस्ता रोको छेडण्यात येईल असा इशाराही संबंधित विभागांना ‘केला होता. याबाबत ‘प्रहार’ ने दोन दिवसापूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी शाम खुणेकर यांनी रस्त्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.