मालवण ग्रामीण रुग्णालयातील सेवा सुविधांचा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेतला आढावा
वैद्यकीय अधीक्षक व बांधकाम अधिकारी यांच्यासोबत चर्चा; वैद्यकीय अधिकारी बालाजी पाटील यांचे केले स्वागत
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील हे मालवण ग्रामीण रुग्णालयात पुन्हा नियुक्त झाले आहेत. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना पदाधिकारी यांनी डॉ. बालाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयातील सेवा सुविधांचा दत्ता सामंत यांनी घेतला आढावा घेतला. वैद्यकीय अधीक्षक व बांधकाम अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. असे दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी सभापती सुधीर साळसकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना जिल्हा पदाधिकारी प्रितम गावडे, दादा नाईक, महेश सारंग, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुकाप्रमुख प्रियांका मेस्त्री, जयमाला मयेकर, अरुण तोडणकर, राजू बिडये, संदीप भोजणे, भाई मांजरेकर, मनोज वायंगणकर, अमित सावंत, तथागत मालवणकर, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर, आबा शिर्सेकर, सुरज बिरमोळे, शानू वालावलकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयातील सेवा सुविधाबाबत चर्चा
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अजित पाटील, अभियंता स्नेहा लोखंडे यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चर्चा केली. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्नाशील आहेत. ज्या सेवा सुविधा कमी असतील त्याबाबत माहिती घ्या. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून समस्या दुरु केल्या जातील. रुग्णालय इमारतीला काही ठिकाणी गळती आहे त्याचा विचार करता इमारतीवर शेड उभारणी गरजेची आहे. त्याचा वापर काही साहित्य ठेवणे, रुग्णालयातील बेडशीट वाळवणे यांसह अन्य बाबतीतही होईल त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच काही आवश्यक ठिकाणी वॉश बेसिन व अन्य काही प्राथमिक सुविधा असतील तर त्या तात्काळ करा. काही आवश्यकता लागल्यास सांगा आम्ही आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहोत. असे दत्ता सामंत यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला सांगितले.
स्त्री रोग तज्ञ नियुक्ती व्हावी
मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती करावी या मागणीनंतर आठवड्यातून काही दिवस स्त्री रोग तज्ञ नियुक्त करण्यात आली. मात्र, त्यात बदल करण्यात आला आता आठडवड्यातून बुधवार एक दिवस ही नियुक्ती करण्यात आली. मोठे ग्रामीण असलेल्या या ठिकाणी महिला रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी कायमस्वरूपी स्त्री रोग तज्ञ असावा अशी आमची मागणी असताना स्त्री रोग तज्ञ अत्यावश्यक आहेत. देण्यात आलेली नियुक्ती आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस अथवा कायम स्वरूपी मिळावी. अन्यथा या बाबत आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष अधिवेशन काळात वेधले जाईल. असे दत्ता सामंत यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांना सांगितले.











