भूषण बोडस यांची तालुकास्तरीय आत्मा शेतकरी सल्ला समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

देवगड │ प्रतिनिधी :
पालकमंत्री मा. नामदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार तालुकास्तरीय आत्मा (शेतकरी सल्ला समिती) अध्यक्षपदी भाजपाचे श्री. भूषण बोडस, पडेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज, दिनांक १० जुलै २०२५ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात समितीची पहिली सभा संपन्न झाली.

या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील यांनी श्री. भूषण बोडस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच समितीतील नव्याने नियुक्त सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सचिव श्री. निकेतन राणे यांनी आत्मा योजनेंतर्गत विविध मंजूर कार्यक्रमांची माहिती दिली. खरीप हंगामाचे नियोजन, विमा योजना, खते, बियाणे, कीटकनाशके यासंबंधीही चर्चा झाली.

समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. भूषण बोडस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “सर्वांना सोबत घेऊन काम करणे हेच आपले उद्दिष्ट असून, कृषी विभागासह इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.” तसेच, “आंबा हे तालुक्यातील प्रमुख पीक असून त्याच्या अनुषंगाने विशेष लक्ष दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सभेच्या शेवटी सचिव श्री. निकेतन राणे यांनी अध्यक्षांची परवानगी घेऊन सर्वांचे आभार मानत सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले

यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष श्री. बाळ खडपे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. बोडस यांचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियांका साळस्कर, माजी जि.प. सदस्य संजय बोंबडी, पदाधिकारी अजित राणे, बाळा गावकर, अतुल वेलणकर, कृष्णा धुरी, प्रसाद देवधर, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, सरपंच विश्वनाथ खानविलकर, श्रीमती वैशाली तोडणकर, श्रीमती रंजना कदम, राजेंद्र वालकर, सुभाष धुरी यांचा समावेश होता. अनेक शेतकरी व कार्यकर्तेही या सभेला उपस्थित होते.