आरोग्य मंदिर येथून कार गेली चोरीला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील आरोग्य मंदिर येथून कार लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 9 जुलै रोजी रात्री 10 वा.सुमारास घडली आहे.
बशीर मुसा काझी (58, रा.एमआयडीसी झाडगाव, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री त्यांनी आपल्या मालकीची ह्युंडाई कार (एमएच-08-एजी-2166) ही आरोग्य मंदिर येथे चावीसह उभी करुन ठेवलेली होती. ती अज्ञाताने चोरुन नेली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.