मिठमुंबरी शाळेत गावठी बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी घेतला व्यवहारज्ञानाचा अनुभव

शिरगाव (प्रतिनिधी) –  देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मिठमुंबरी क्र. १ येथे गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी निसर्गात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या, खेकडे, गावठी अंडी, कालवे, मासे, गावठी कोंबड्या आदींचे स्टॉल उभारून त्यांची विक्री केली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान तसेच उद्योजकतेचे प्राथमिक धडे मिळाले. स्वतः वस्तू मांडून ग्राहकांशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांना मिळाला. भविष्यात या ज्ञानाचा उपयोग स्वावलंबनासाठी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

या उपक्रमास मिठमुंबरी गावाचे सरपंच श्री. बाळकृष्ण गावकर, मुख्याध्यापक श्री. मधुसूदन घोडे, उपसरपंच श्री. गुरुनाथ गावकर, शिक्षक सुरेश साळुंके, सचिन धुरी, आरती ठाकरे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. हेमंत तोडणकर, उपाध्यक्षा सौ. शिल्पा गावकर, समितीतील सर्व सदस्य, कुणकेश्वर बिटचे विस्तार अधिकारी धर्मराज धुरा सर, कुणकेश्वर व वाळकेवाडी शाळेतील शिक्षक मंगेश कदम सर, लवटे सर, देवगड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी मेधा राणे मॅडम, बीआरसीचे सर्व कर्मचारी, शिक्षण विभागातील स्टाफ, युट्युब चॅनलचे सर्वेसर्वा ओंकार बांदकर, तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा अभिनव उपक्रम शाळेच्या शिक्षक व व्यवस्थापनाच्या सहकार्याने यशस्वी झाला.