सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व लाकूड व्यवसाय संघटनेच्यावतीने सावंतवाडी येथील नवनियुक्त उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक यांच्याशी जिल्ह्यातील शेतकरी व लाकूड व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व लाकूड व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष बाळा भिसे, मधु बावकर, शकील शेख, आणि आंबोली बिटचे अध्यक्ष संदीप सुकी यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख सदस्य उपस्थित होते.
नवीन उपवनसंरक्षक यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील वन आणि कृषी क्षेत्रातील समस्यांवर अधिक प्रभावीपणे लक्ष दिले जाईल, अशी आशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लाकूड व्यवसायातील अडचणी, शेतकऱ्यांच्या वनहक्क आणि इतर संबंधित विषयांवर भविष्यात सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.










