नेमळे विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वक्तृत्व स्पर्धा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते. पाचवी ते आठवी या लहान गटातून कुमारी वैभवी पांडुरंग पाटकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर मयुरेश महेश हवालदार याने द्वितीय आणि जिज्ञेशा कमलेश भैरे हिने तृतीय क्रमांक मिळवला.

मोठ्या गटातून (इयत्ता नववी ते बारावी) रोहन रामचंद्र गावडे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर लावण्या जयवंत राणे द्वितीय आणि मनाली दिलीप परब तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

यावेळी नितीन धामापूरकर आणि प्राचार्या के.व्ही. बोवलेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.