लांजा येथे २६ जुलै रोजी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन 

लांजा (प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय लांजाचे उद्घाटन २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे .

हा कार्यक्रम लांजा शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते होणार आहे .

स्पर्धा परीक्षा वाचनालय हे लांजा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. तरी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी त्याचप्रमाणे पोलीस भरतीसाठी इच्छुक असणारे तरुणवर्ग यांनी व तमाम लांजा वासियांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ यांनी केले आहे.