सावंतवाडी: प्रतिनिधी :कोलगाव – भोमवाडी येथील निवृत्त मुख्याध्यापिका मालिनी शामराव चव्हाण (८२) यांचे शुक्रवार ४ जुलै रोजी निधन झाले. त्यांनी चौकुळ येथून आपल्या शिक्षकी पेशाला प्रारंभ केला. त्यानंतर राजापूर तालुक्यात जैतापूर, पाचल, रायपाटण येथे सेवा बजावली. या काळात कुटुंब नियोजन, प्रौढ शिक्षण वर्ग, अल्पबचत कार्यक्रम राबविले. ३० ऑक्टोबर २००१ मध्ये त्या रायपाटण शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना १९८५ मध्ये गुरुवर्य अ. आ. देसाई आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच अखिल भारतीय शिक्षक संघटना पुणे येथे दहा दिवसांचे सेमिनार यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नात, नातू, नात जावई असा मोठा परिवार आहे. महेशकुमार चव्हाण व राजापूर येथील ॲड. मिलिंद चव्हाण यांच्या त्या आई होत.
——–











