घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून औपचारिकरित्या करण्यात आली.
या सप्ताहांतर्गत ११ एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत लवेल येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर १३ एप्रिल रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने १० तास वाचन व अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला असून “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाविषयी विचार” या विषयावर वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात येणार आहे. याच दिवशी प्रा. व्ही. डी. कांबळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
१४ एप्रिल रोजी पुन्हा एकदा डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील तसेच रजिस्ट्रार संदीप मुनघाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच एनएसएस विभागाचे प्रा. व्ही. एम. माळी, प्रा. विजय सावंत, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.