रत्नागिरी:
भारत शिक्षण मंडळ संचलित देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभागांमार्फत करण्यात आले होते.
गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन, व्यासपूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख सहा.प्रा.वीणा कोकजे यांनी केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षकवृंंदाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.यानंतर गुरुपौर्णिमेचे महत्त्व कु.निकिता पाष्टे(द्वितीय वर्ष कला) हिने सांगितले. कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी गुरुप्रती कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.तसेच गीत,कविता,समूहनृत्य इ.या विविध कलाप्रकारातून विद्यार्थ्यांनी गुरुचा महिमा सांगितला सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, मराठी विभागप्रमुख सहा.प्रा.वीणा कोकजे ,कला,वाणिज्य, विज्ञान शाखेचे विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, तिन्ही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु श्रद्धा महाराणा व आभार स्वराज्ञी तांबे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.











