यशतेज फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा महात्मा गांधी लायब्ररी मंडणगड येथे जाहीर सत्कार

मंडणगड – यशतेज फाउंडेशन च्या वतीने इंग्रजी व मराठी विषयात विशेष प्राविण्य मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या उत्कर्ष कौस्तुभ जोशी (इंग्रजी विषय) आणि आर्वी श्रीपाद कोकाटे (मराठी विषय) या विद्यार्थ्यांचा आज महात्मा गांधी लायब्ररी, मंडणगड येथे जाहीर सत्कार करण्यात आला.

या गौरव सोहळ्यास मंडणगड शहरातील मान्यवर नागरिक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिमत्त्वे मोठ्या संख्येने उपस्थित राहिली. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब टूले, विशाल जाधव, राजेश इंगळे, श्रीकांत जाधव, कौस्तुभ जोशी, नंदू गांगण, विलास थोरे, शंकर जंगम, किरण साखरे, चारुलता पारेख मॅडम, देवयानी करमरकर मॅडम, ॲड. हर्षल तुळसणकर, ॲड. आदित्य सुळे, ॲड. सुमेश घागरूम, ॲड. शोभा प्रजापती मॅडम, दीपिका घोसाळकर, डॉ. अरुण ढंग, अनविक कदम, मृणालीने हुंबरे मॅडम, स्नेहल वसावे, वृषाली पोतनीस, जुई घोसाळकर, सलोनी राठोड, बशीद मुकादम, मंदार शेलार, राहुल राठोड, साहिल सावंत, अभिजीत म्हापरलकर आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.

या सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांचे शैक्षणिक यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

यशतेज फाउंडेशन ने घेतलेली ही पुढाकारपूर्ण पावले शिक्षणाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करत असून, गुणवत्तेचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी मन:पूर्वक दाद दिली.