अक्षरा बांदेकर शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम

दोडामार्ग : प्रतिनिधी

साटेली भेडशी येथील करुणा सदन स्कूलची विद्यार्थीनी अक्षरा जितेद्र बांदेकर हीने माध्यमिक राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हात तीने नववा क्रमांक मिळविला. कोणतेही बाह्य क्लास न करता स्वतः अभ्यास करून तीने हे यश संपादन केले आहे. तीच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.