मोदी@9 अतंर्गत राजापुरात बुध्दीजीवींची बैठक संपन्न
राजापूर (प्रतिनिधी): समाजात विविध स्तरात काम करणाऱ्या बुध्दीजीवी वर्गाच्या सुचना आणि मार्गदर्शनातुन भविष्यातील कामाची दिशा ठरवून तसे काम करण्याचा संकल्प करणे शक्य होते. त्यामुळे राजापुरातील बुध्दीजीवींनी सुचविलेल्या सुचनांचा निश्चितच विचार करून त्याप्रमाणे भविष्यात बदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आणि कार्य आंम्ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी कटीबध्द असू अशी ग्वाही भाजपाचे मोदी @9 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे सयोजक माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
राजापूर तालुका भाजपाच्या वतीने समाजाभिमुख काम करणाऱ्या बुद्धिजीवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी राजापूर हायस्कुलच्या कलामंदीर सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विधानसभा क्षेत्र मोदी @9 उपक्रमाचे संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपा प्रदेश महिला सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, जिल्हा सहकार सेल अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. अतुल नवरे, ॲड. पराग मोदी, ॲड. चंद्रशेखर अभ्यंकर, डॉ. सौ. तृप्ती पाध्ये, अर्बन बँक संचालक दिनानाथ कोळवणकर, डॉ. शेखर पाध्ये, प्रकाश भिवंदे, सौ. शीतल पटेल, सौ. रसिका कुशे, हरिश्चंद्र शिगवण, सौ. गौरी अभ्यंकर, पत्रकार नरेंद्र मोहिते आदींनी आपली मते मांडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबविलेल्या योजना निश्चितच चांगल्या आहेत, मात्र आजही अनेक योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचल्या नसून त्या पोहचविण्याबाबत अंमलबजावणी करावी अशी सुचना केली. तर नवीन शैक्षणिक धोरण, प्रशासकिय कामकाजातील शिथीलता त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी ससेहोलपट, नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, रोजगार भिमुख प्रकल्प यावेत, महिलांसाठी असलेल्या योजनांची अधिक अंमलबजावणी व्हावी अशाही सुचना या मान्यवरांनी मांडल्या.
यावर प्रमोद जठार यांनी उपस्थित मान्यवरांनी उपस्थित केलेले प्रश्न व सुचनांचे स्वागत करताना भविष्यात निश्चितच यावर आंम्ही काम करू अशी ग्वाही दिली. आपण समाजात काम करणारी समाज सुधारक मंडळी आहात, पंतप्रधान मोदींचे काम आपणही लोकांना सांगा आणि कायमच असे आंम्हाला मार्गदर्शन करत रहा असे आवाहन यावेळी जठार यांनी केले.
याप्रसंगी प्रा. मारूती कांबळे, चंद्रकांत लिंगायत, विजय कुरूप, राजापूर अर्बन बँक संचालक जयंत अभ्यंकर, सौ. सुयोगा जठार, सौ. संजीवनी मालपेकर, सौ. शुभांगी सोलगावकर, ॲड. प्रविण नागरेकर, प्रसन्न मालपेकर, पत्रकार प्रकाश वळंजू, संदेश आंबेकर आदींसह भाजपा पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भाजपा तालुका सरचिटणीस ॲड. सुशांत मराठे यांनी प्रास्ताविक करून या बैठकीची माहिती दिली. तर आभार विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांनी मानले.
फोटो 12 आरजेपी 1
मोदी @9 या उपक्रमांतर्गत राजापुरात बुध्दीजीवी वर्गाच्या बैठकीत बोलताना प्रमोद जठार याप्रसंगी अन्य मान्यवर.










