मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथील इयत्ता ८वीतील विद्यार्थी कुमार दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये ग्रामीण सर्वसाधारण मधून सिंधुदुर्ग जिह्यात प्रथम आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असते. या परीक्षेत दक्षेशने 224 गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण मधून सिंधुदुर्ग जिह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. शाळा व संस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करून दक्षेश चा विशेष गौरव करण्यात आला.शालेय समिती सदस्य संजय बांबूळकर, कार्यकारणी सदस्य धर्माजी आडकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, गौरी तवटे, हरिदास महाले, प्रसाद बागवे, रश्मी कुमठेकर,नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर, सुविधा बोरकर, तेजल बागडे, मनोज मुणगेकर आदी उपस्थित होते.













